राज ठाकरेंसारखं सत्य इतरांना का बोलता येत नाही?
राज ठाकरे तुफान सुटले आहेत. त्यांच्या प्रत्येक सभेनंतर नव्या सभांसाठीच्या मागणीत वाढ होते आहे. सामाजिक माध्यमांमध्ये त्यांच्या भाषणातील दाखलेच्या दाखले, क्लिप्सच्या क्लिप्स धुमाकूळ घालत आहेत. भाजप-शिवसेना युतीला त्यांचा प्रतिवाद करणे कठीणच नाहीतर अशक्य झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल हरिसालच्या मुद्द्यावर सावरासावर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांची जी फटफजिती झाली, ती महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कधीही कुणाचीही झाली नव्हती! हरिसालच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी …