चिनी जनतेची खिलाडूवृत्ती
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये प्रथम आणि रिओमध्ये मात्र चीनला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. खेळाडूंची कामगिरी खालावली तरी चिनी जनतेने मात्र खेळाडूंना दोष न देता याचे खापर तेथील सोयीसुविधा, सदोष पंचगिरी, भोजनव्यवस्था यावर फोडले. लोकांच्या या खिलाडूवृत्तीने सरकारची चिंता मात्र मिटली.. ऑलिम्पिक पदतालिकेतील स्थान हे जागतिक पटलावरील देशाच्या तुलनात्मक शक्तीचे निदर्शक असल्याचा सार्वत्रिक समज आहे. देशातील खेळ-संस्कृती आणि …