उत्तर प्रदेशचा जोर का झटका
११ मार्चचा पाच राज्यांचा निवडणूक निकाल अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. २०१४ च्या निवडणुकीत ज्या उत्तर प्रदेशने नरेंद्र मोदींना पूर्ण बहुमतासह देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ केलं, त्या राज्यातील मतदारांनी पुन्हा एकदा मोदींच्या भारतीय जनता पक्षाच्या झोळीत भरभरून विश्वास टाकला आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर निवडणूक लढवली होती. त्याला उत्तर प्रदेशच्या …