Month: January 2019

कोशिश तुम्हारी जारी है, पर जेएनयु तुम पर भारी है!

  फेब्रुवारी २०१६ मध्ये दिल्लीस्थित अनेक इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या मदतीने जवाहरलाल नेहरू विद्यापीठा(जेएनयु)विरुद्ध राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून युद्ध पुकारल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी एकूण ३२ विद्यार्थ्यांच्या विरुद्ध राष्ट्रद्रोहाची चार्जशीट दिल्ली पोलिसांनी तयार केली. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसल्यामुळे दिल्ली पोलिस पूर्णपणे केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत – म्हणजे सरळ सरळ मोदी सरकारच्या कार्यक्षेत्रात- कार्यरत आहेत. फेब्रुवारी २०१६ मध्ये राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवत …

कोशिश तुम्हारी जारी है, पर जेएनयु तुम पर भारी है! Read More »

१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे?

  २०१६ मधील ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पाकिस्तानवर काहीच परिणाम झाला नाही आणि नोटबंदीने प्रचंड फायदा होण्याऐवजी तोटाच मोठा झाला, या दोन वास्तवाची कबुली खुद्द सरकारनेच वेगवेगळ्या माध्यमांतून देऊ केली आहे. जे दोन मुद्दे मोदींनी आपल्या सरकारची सर्वोत्तम कामगिरी म्हणून मिरवले, त्याच आघाडीवर त्यांचे सरकार सपेशल अपयशी ठरल्याचे सर्वसामान्य जनतेला ज्ञात झाल्यावर आता आर्थिक ‘निकषावर’ १० टक्के …

१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे? Read More »

‘सीपेक’च्या आडून लष्करी डावपेच

  मुख्यत्वे आर्थिक सहकार्यासाठी असलेल्या ‘सीपेक’च्या आडून चीन पाकिस्तानात संरक्षणसामग्रीचे उत्पादन करणार आहे. या माध्यमातून चीन व पाकिस्तान यांची लष्करी जवळीक घट्ट होत असल्याने भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्पाचा (बीआरआय) महत्त्वाचा भाग असलेल्या ‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गा’ला (सीपेक) या दोन देशांदरम्यानच्या लष्करी सहकार्याचा विळखा पडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. …

‘सीपेक’च्या आडून लष्करी डावपेच Read More »

रात्र अजून वैऱ्याचीच आहे…

  २०१८ च्या अखेरीस आलेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ‘जान’ आणली आहे. या निवडणूक निकालांनंतर, ‘मोदींना पर्याय कोण?’ हा प्रश्न विचारणारे आता नितीन गडकरींमध्ये ‘विकासपुरुष’ शोधू लागले आहेत. तीन राज्यांतील निवडणूक निकालांच्या आदल्या दिवसापर्यंत हे राजकीय पंडित मोदींनंतर, म्हणजे २०२४ मध्ये, योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान होणार, असे छातीठोकपणे सांगत होते. …

रात्र अजून वैऱ्याचीच आहे… Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger