गेल्या दशकाच्या अस्वस्थ नोंदी
सध्या जगाचाच कौल उदारमतवादी लोकशाहीकडून लोकानुनयी अधिकारशाहीकडे झुकलेला दिसतो आहे. विविध देशांतील सत्तेचा आढावा घेतल्यास हे चित्र दिसते. ज्या जागतिकीकरण व उदारमतवादी लोकशाहीची मांडणी १९९१नंतर करण्यात आली होती, त्याची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. या धोरणांत बदल न झाल्यास, पुढील दशकही लोकानुनयी अधिकारशाहीचे असेल. जागतिक स्तरावर २०११ ते २०२०चे दशक हे लोकानुनयी अधिकारशाहीचा पुरस्कार करणारे होते. …