Parimal Maya Sudhakar

भाजपच्या काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्यामागे २०१९च्या लोकसभा निवडणुका कारणीभूत आहेत!

  काल जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजपने काढता पाय घेत राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे प्रत्यक्षपणे मान्य केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षपद आणि महत्त्वाची अनेक मंत्रालये भाजपकडे होती. केंद्रात बहुमत, केंद्रातील सरकारकडे लष्कर व निम-लष्करी दलांचे नियंत्रण आणि राज्याच्या सत्तेत सहभाग असताना जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची मोठी जबाबदारी भाजपकडे होती. राष्ट्रीय सुरक्षा व राष्ट्रीय एकात्मेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या …

भाजपच्या काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्यामागे २०१९च्या लोकसभा निवडणुका कारणीभूत आहेत! Read More »

खळबळ माजवणे आणि विरोधकांची बदनामी करत राजकीय लाभ उठवणे, ही सत्ताधारी पक्षाची प्रचारपद्धती

  देशाच्या पंतप्रधानाच्या हत्येचा कट रचणे, राज्याच्या मुख्यमंत्र्याला धमक्यांचे पत्र पाठवणे, या गंभीर बाबी आहेत. यांवर राजकारण करायला नको. योग्य ती चौकशी होऊन न्यायालयापुढे सर्व पुरावे सादर करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. Law must take its own course. पण असे होताना दिसत नाही. पोलीस जे म्हणत आहेत, त्यावर विश्वास ठेवणे समाजातील अनेक व्यक्ती व संघटनांना …

खळबळ माजवणे आणि विरोधकांची बदनामी करत राजकीय लाभ उठवणे, ही सत्ताधारी पक्षाची प्रचारपद्धती Read More »

दोन पावले पुढे, एक पाऊल मागे

  चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना २०२२ नंतरही अध्यक्षपदी राहू देण्याच्या उघड हेतूने करण्यात येत असलेली घटनादुरुस्ती राजकीय सुधारणांच्या विरोधात जाणारी आहे. ची नच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीने राज्यघटनेत सुधारणा करत देशाचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदांसाठी असलेली प्रत्येकी पाच वर्षांच्या दोन कालावधींची मर्यादा काढून टाकण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या अनुषंगाने अध्यक्ष शी जिनपिंग हे हुकूमशाही प्रवृत्तीचे …

दोन पावले पुढे, एक पाऊल मागे Read More »

चिनी समाजवाद नव्या वळणावर

  चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली समाजवादी विकास आणि संस्कृती यांच्या मिलाफातून राष्ट्रीय अस्मितेचे नवसर्जन करण्याचा मानस पक्षाच्या काँग्रेसमध्ये व्यक्त झाला आहे. चीनच्या राजकीय पटलावर दर पाच वर्षांनी भरणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय काँग्रेसची आज सांगता होत आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या देशभरातील विविध क्षेत्रांतील पक्षशाखांमधून काळजीपूर्वक निवडण्यात आलेले २३०० प्रतिनिधी या आठवडाभराच्या काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. ही पंचवार्षिक …

चिनी समाजवाद नव्या वळणावर Read More »

डोकलाम-पल्याड जायलाच हवे!

  भारत आणि चीनदरम्यान भूतानच्या प्रभुत्वाखालील डोकलाम क्षेत्रात लष्करी तणाव उत्पन्न झाल्याच्या पाश्र्वभूमीवर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेले भाषण महत्त्वपूर्ण आहे. भारत-चीन संबंधांवर भाष्य करताना ‘युद्ध हा कोणत्याही समस्येवरील उपाय होऊ शकत नाही’ आणि ‘चच्रेतून प्रश्न सोडवण्यात राष्ट्रहित’ असल्याचा  त्यांचा सूर होता. दीड महिन्यांहून अधिक काळापासून डोकलाम भागात भारत व चीनचे सन्य एकमेकांसमोर …

डोकलाम-पल्याड जायलाच हवे! Read More »

आहे शेजारी तरी!

भारताने चीनवर दुसऱ्या बाजूने लष्करी दबाव निर्माण करावा, अशी अमेरिकेची इच्छा आहे. भारत आणि चीन.. भाषा, संस्कृती, राजकीय विचार यांच्याबाबतीत परस्परांहून भिन्न असलेले दोन शेजारी देश. अशी भिन्नता असली तरी गेल्या अडीच हजार वर्षांपासून या दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण होत राहिली. भारत व चीनमधील १८ तज्ज्ञांच्या लेखांचा समावेश असणारं हे पुस्तक त्याची आठवण करून देतंच, …

आहे शेजारी तरी! Read More »

उत्तर प्रदेशचा जोर का झटका

  ११ मार्चचा पाच राज्यांचा निवडणूक निकाल अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. २०१४ च्या निवडणुकीत ज्या उत्तर प्रदेशने नरेंद्र मोदींना पूर्ण बहुमतासह देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ केलं, त्या राज्यातील मतदारांनी पुन्हा एकदा मोदींच्या भारतीय जनता पक्षाच्या झोळीत भरभरून विश्वास टाकला आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर निवडणूक लढवली होती. त्याला उत्तर प्रदेशच्या …

उत्तर प्रदेशचा जोर का झटका Read More »

एकविसावे शतक कुणाचे?

  ज्याप्रमाणे १९वे शतक हे युरोपच्या आणि २०वे शतक हे सोव्हिएत संघ व अमेरिकेच्या वर्चस्वाचे होते, तसे २१वे शतक चीनच्या वर्चस्वाचे असेल असे एक गृहीतक आहे. मात्र यासाठी चीनला विज्ञान व तंत्रज्ञान, उद्योग, लष्करी सुसज्जता यांच्याकडे लक्ष देतानाच विकासाचे नवे मॉडेल उभे करावे लागेल.. या  वर्षभरात ‘चीन-चिंतन’ या सदरात आपण चीनच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेण्याचा …

एकविसावे शतक कुणाचे? Read More »

चिनी समाज व साम्यवादी पक्ष

  चीनच्या संदर्भातील खरा प्रश्न आहे की समाजातील ज्या गटांची भरभराट झाली आहे ते साम्यवादी पक्षाचे नेतृत्व आणि कार्यप्रणाली कधीपर्यंत मान्य करणार? चीनने आíथक विकासातील तो टप्पा आता गाठला आहे जिथे समाजातील सर्वाधिक संपन्न गटांना आपले स्थान टिकवण्यासाठी साम्यवादी पक्षाची गरज उरलेली नाही. मात्र साम्यवादी पक्षाच्या म्हणण्यानुसार चिनी समाजात पक्षाचे स्थान अमर्त्य आहे.  चीनमध्ये आर्थिक सुधारणांची …

चिनी समाज व साम्यवादी पक्ष Read More »

विचारधारा ते संकल्पनांचा प्रवास

  जिआंग झेमिन व हु जिंताव प्रमाणे जिनपिंग यांची मांडणीसुद्धा वैचारिक सिद्धांताऐवजी वैचारिक संकल्पनेच्या श्रेणीत मोडणारी आहे. जगामध्ये समाजवादाचा प्रवास स्वप्नाळू मांडणी ते वैज्ञानिक विचारधारा असा झाला असला तरी, चीनमध्ये साम्यवादी पक्षाचा प्रवास मार्क्‍सवादी विचारधारा ते स्वप्नाळू संकल्पना असा उलटय़ा दिशेने घडत असल्याचे दिसते आहे. चीनच्या साम्यवादी पक्षाने अलीकडेच एका अधिकृत वक्तव्यात पक्षाचे महासचिव आणि …

विचारधारा ते संकल्पनांचा प्रवास Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger