China

‘सीपेक’च्या आडून लष्करी डावपेच

  मुख्यत्वे आर्थिक सहकार्यासाठी असलेल्या ‘सीपेक’च्या आडून चीन पाकिस्तानात संरक्षणसामग्रीचे उत्पादन करणार आहे. या माध्यमातून चीन व पाकिस्तान यांची लष्करी जवळीक घट्ट होत असल्याने भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्पाचा (बीआरआय) महत्त्वाचा भाग असलेल्या ‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गा’ला (सीपेक) या दोन देशांदरम्यानच्या लष्करी सहकार्याचा विळखा पडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. …

‘सीपेक’च्या आडून लष्करी डावपेच Read More »

दोन पावले पुढे, एक पाऊल मागे

  चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना २०२२ नंतरही अध्यक्षपदी राहू देण्याच्या उघड हेतूने करण्यात येत असलेली घटनादुरुस्ती राजकीय सुधारणांच्या विरोधात जाणारी आहे. ची नच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीने राज्यघटनेत सुधारणा करत देशाचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदांसाठी असलेली प्रत्येकी पाच वर्षांच्या दोन कालावधींची मर्यादा काढून टाकण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या अनुषंगाने अध्यक्ष शी जिनपिंग हे हुकूमशाही प्रवृत्तीचे …

दोन पावले पुढे, एक पाऊल मागे Read More »

चिनी समाजवाद नव्या वळणावर

  चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली समाजवादी विकास आणि संस्कृती यांच्या मिलाफातून राष्ट्रीय अस्मितेचे नवसर्जन करण्याचा मानस पक्षाच्या काँग्रेसमध्ये व्यक्त झाला आहे. चीनच्या राजकीय पटलावर दर पाच वर्षांनी भरणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय काँग्रेसची आज सांगता होत आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या देशभरातील विविध क्षेत्रांतील पक्षशाखांमधून काळजीपूर्वक निवडण्यात आलेले २३०० प्रतिनिधी या आठवडाभराच्या काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. ही पंचवार्षिक …

चिनी समाजवाद नव्या वळणावर Read More »

डोकलाम-पल्याड जायलाच हवे!

  भारत आणि चीनदरम्यान भूतानच्या प्रभुत्वाखालील डोकलाम क्षेत्रात लष्करी तणाव उत्पन्न झाल्याच्या पाश्र्वभूमीवर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेले भाषण महत्त्वपूर्ण आहे. भारत-चीन संबंधांवर भाष्य करताना ‘युद्ध हा कोणत्याही समस्येवरील उपाय होऊ शकत नाही’ आणि ‘चच्रेतून प्रश्न सोडवण्यात राष्ट्रहित’ असल्याचा  त्यांचा सूर होता. दीड महिन्यांहून अधिक काळापासून डोकलाम भागात भारत व चीनचे सन्य एकमेकांसमोर …

डोकलाम-पल्याड जायलाच हवे! Read More »

एकविसावे शतक कुणाचे?

  ज्याप्रमाणे १९वे शतक हे युरोपच्या आणि २०वे शतक हे सोव्हिएत संघ व अमेरिकेच्या वर्चस्वाचे होते, तसे २१वे शतक चीनच्या वर्चस्वाचे असेल असे एक गृहीतक आहे. मात्र यासाठी चीनला विज्ञान व तंत्रज्ञान, उद्योग, लष्करी सुसज्जता यांच्याकडे लक्ष देतानाच विकासाचे नवे मॉडेल उभे करावे लागेल.. या  वर्षभरात ‘चीन-चिंतन’ या सदरात आपण चीनच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेण्याचा …

एकविसावे शतक कुणाचे? Read More »

चिनी समाज व साम्यवादी पक्ष

  चीनच्या संदर्भातील खरा प्रश्न आहे की समाजातील ज्या गटांची भरभराट झाली आहे ते साम्यवादी पक्षाचे नेतृत्व आणि कार्यप्रणाली कधीपर्यंत मान्य करणार? चीनने आíथक विकासातील तो टप्पा आता गाठला आहे जिथे समाजातील सर्वाधिक संपन्न गटांना आपले स्थान टिकवण्यासाठी साम्यवादी पक्षाची गरज उरलेली नाही. मात्र साम्यवादी पक्षाच्या म्हणण्यानुसार चिनी समाजात पक्षाचे स्थान अमर्त्य आहे.  चीनमध्ये आर्थिक सुधारणांची …

चिनी समाज व साम्यवादी पक्ष Read More »

विचारधारा ते संकल्पनांचा प्रवास

  जिआंग झेमिन व हु जिंताव प्रमाणे जिनपिंग यांची मांडणीसुद्धा वैचारिक सिद्धांताऐवजी वैचारिक संकल्पनेच्या श्रेणीत मोडणारी आहे. जगामध्ये समाजवादाचा प्रवास स्वप्नाळू मांडणी ते वैज्ञानिक विचारधारा असा झाला असला तरी, चीनमध्ये साम्यवादी पक्षाचा प्रवास मार्क्‍सवादी विचारधारा ते स्वप्नाळू संकल्पना असा उलटय़ा दिशेने घडत असल्याचे दिसते आहे. चीनच्या साम्यवादी पक्षाने अलीकडेच एका अधिकृत वक्तव्यात पक्षाचे महासचिव आणि …

विचारधारा ते संकल्पनांचा प्रवास Read More »

भारतापुढील आव्हाने व उपाययोजना

भारत- चीन संबंधांचा विचार करता चार महत्त्वाची आव्हाने आपल्यासमोर आहेत. दोन्ही देशांतील सीमावाद सोडवणे, ‘रोड आणि बेल्ट’ पुढाकारात सहभागी होण्यासंबंधी. भारतीयांना स्वत:च्या राजकीय व्यवस्थेऐवजी स्पर्धक/शत्रू राष्ट्राची राजकीय व्यवस्था अधिक चांगली वाटू लागणे हे तिसरे आव्हान आहे. चौथे मोठे आव्हान हे या देशाच्या संभाव्य अपयशातून उभे राहणारे आहे. जागतिक पटलावरील चीनच्या उदयामुळे भारतापुढे उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा …

भारतापुढील आव्हाने व उपाययोजना Read More »

नेहरूंचे काय चुकले?

  १९६२ मध्ये भारतीय लष्कराची तयारी नसताना, लष्कराला पुरेशी संसाधने उपलब्ध करून न देता नेहरू सरकारने ‘फॉर्वर्ड पॉलिसी‘ राबवली.. नेहरूंना वाटायचे की सीमेवर भारत- चीन दरम्यान चकमकी झडत राहतील, मात्र त्यातून उद्भवणाऱ्या तणावाचे रूपांतर चीनद्वारे युद्ध पुकारण्यात होणार नाही.. सन १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर सुरू झालेली भारतीय अपयशाची चिकित्सा अद्याप सुरू आहे. युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे आसन …

नेहरूंचे काय चुकले? Read More »

पाण्याचे राजकारण धुमसते आहे!

  चीनच्या ब्रह्मपुत्रेवरील धरणांमुळे समस्या उभी राहण्याची शक्यता असली, तरी तूर्तास यावरून युद्ध करण्याची चीनची तयारी नाही आणि भारताला परवडणारे नाही. तिसरे महायुद्ध, जर झालेच तर, पाण्याच्या प्रश्नावरून लढले जाणार असे भाकीत अनेक सामरिक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. महासागरांवरील अधिकारांसह नदीच्या पाण्यावरील अधिकाराच्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या देशांमध्ये उत्पन्न होणाऱ्या तंट्याचे रूपांतर महायुद्धात होईल असे ब्रह्मा चेलानीसारख्या …

पाण्याचे राजकारण धुमसते आहे! Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger