पाण्याचे राजकारण धुमसते आहे!
चीनच्या ब्रह्मपुत्रेवरील धरणांमुळे समस्या उभी राहण्याची शक्यता असली, तरी तूर्तास यावरून युद्ध करण्याची चीनची तयारी नाही आणि भारताला परवडणारे नाही. तिसरे महायुद्ध, जर झालेच तर, पाण्याच्या प्रश्नावरून लढले जाणार असे भाकीत अनेक सामरिक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. महासागरांवरील अधिकारांसह नदीच्या पाण्यावरील अधिकाराच्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या देशांमध्ये उत्पन्न होणाऱ्या तंट्याचे रूपांतर महायुद्धात होईल असे ब्रह्मा चेलानीसारख्या …