जम्मू-काश्मीरच्या जीवावर मोदींचे राजकारण
१७ व्या लोकसभेचा प्रचार जसजसा रंगतो आहे, तसतशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाणीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बोली अधिकाधिक स्पष्टपणे ऐकावयास मिळते आहे. संघाच्या काश्मीर आणि राष्ट्रीय सुरक्षा या दोन अत्यंत आवडत्या विषयांना हात घालत मोदी आपल्या प्रत्येक निवडणूक प्रचारसभेची सुरुवात करत आहेत. उदाहरणार्थ, मोदींनी अहमदनगरच्या प्रचारसभेची सुरुवात ‘देशाला एक पंतप्रधान हवा आहे की दोन?’ अशी विचारणा …