मागील पाच वर्षांत मोदी सरकारची कामगिरी घोर निराशाजनक ठरली आहे, कलम ३७० रद्द केल्याने त्यात फरक पडण्याची सुतमात्र शक्यता नाही!
२०१६मध्ये पाकिस्तानधार्जिण्या अतिरेक्यांनी आधी पठाणकोट व नंतर उरी इथे लष्करी छावण्यांवर हल्ले करत भारतीय जवानांच्या हत्या केल्या. त्यानंतर मोदी सरकारने ‘सर्जिकल स्ट्राइक’चा पट मांडला. त्यापूर्वी या प्रकारच्या कारवायांना ‘क्रॉस-बॉर्डर रेड’ म्हणण्यात येत असे. मात्र मोदी सरकारने ‘क्रॉस-बॉर्डर रेड’ला ‘सर्जिकल स्ट्राइक’ या नावाने जल्लोषात साजरे केले. हा जल्लोष एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की, आता काश्मीरमधील दहशतवाद्यांचा …