भाजप

राज ठाकरेंसारखं सत्य इतरांना का बोलता येत नाही?

  राज ठाकरे तुफान सुटले आहेत. त्यांच्या प्रत्येक सभेनंतर नव्या सभांसाठीच्या मागणीत वाढ होते आहे. सामाजिक माध्यमांमध्ये त्यांच्या भाषणातील दाखलेच्या दाखले, क्लिप्सच्या क्लिप्स धुमाकूळ घालत आहेत. भाजप-शिवसेना युतीला त्यांचा प्रतिवाद करणे कठीणच नाहीतर अशक्य झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल हरिसालच्या मुद्द्यावर सावरासावर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांची जी फटफजिती झाली, ती महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कधीही कुणाचीही झाली नव्हती! हरिसालच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी …

राज ठाकरेंसारखं सत्य इतरांना का बोलता येत नाही? Read More »

सत्याची मोडतोड हेच ज्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य आहे, त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवावी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवडणूक अर्ज भरण्याच्या तारखेत बदल करत मुंबईला प्रचार सभा घेतली. त्यांच्या मुंबईच्या भाषणात तीन बाबी ठळकपणे जाणवल्यात. एक, मध्यमवर्गाची वारेमाप स्तुती; दोन, पोलीस कर्मचाऱ्यांवर स्तुतिसुमने; आणि तीन, पुलवामा-बालाकोट या शब्दांचा अनुल्लेख! मुंबईच्या सभेत मोदींनी ना गरीब मतदारांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मते मागितली, ना आपण स्वत: कशी गरिबी अनुभवली आहे यावर ते बोलले. …

सत्याची मोडतोड हेच ज्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य आहे, त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवावी? Read More »

‘नागरिकत्व (संशोधन) विधेयक’ पारित होवो-न होवो, ईशान्येकडील परिस्थिती अधिकाधिक स्फोटक होण्याची चिन्हे आहेत. NRCमध्ये समावेश न झालेल्यांचे भवितव्य अधांतरी आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवार, ४ डिसेंबर रोजी नागरिकत्व (संशोधन) विधेयकाला नव्याने मान्यता दिली. हे विधेयक आता संसदेत मांडण्यात येईल. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले तर भारतीयत्वाच्या मूळ संकल्पनेलाच मुरड बसणार आहे. त्यामुळे खरे तर या विधेयकावर संसदेच्या दोन्ही सदनांसह, संसदेच्या संयुक्त समितीत आणि देशभरात विविध माध्यमांतून साधकबाधक चर्चा व्हायला हवी. खरे तर, २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारला हे विधेयक संसदेत पारित …

‘नागरिकत्व (संशोधन) विधेयक’ पारित होवो-न होवो, ईशान्येकडील परिस्थिती अधिकाधिक स्फोटक होण्याची चिन्हे आहेत. NRCमध्ये समावेश न झालेल्यांचे भवितव्य अधांतरी आहे. Read More »

मोदी सरकारने मोहम्मद अली जीनांची मांडणी कशी योग्य होती, हे सिद्ध करण्याची जणू मनाशी गाठ बांधली आहे!

आज मोहम्मद अली जीना आपल्या कबरीमध्ये विजयी हास्य करत असतील’ अशी कोटी ‘नागरिकत्व (सुधारणा) कायदा २०१९’ला विरोध असणार्‍यांकडून करण्यात येत आहे. वास्तविक आज जर जीना हयात असते तर त्यांना नागरिकत्व (सुधारणा) कायदा २०१९पेक्षा, ज्या पद्धतीने हा कायदा भारतीय संसदेत पारीत करण्यात आला आहे, त्याबाबत स्वत:चे भाकित खरे ठरल्याचे अपूर्व समाधान वाटले असते! जीनांची फाळणीची भूमिका …

मोदी सरकारने मोहम्मद अली जीनांची मांडणी कशी योग्य होती, हे सिद्ध करण्याची जणू मनाशी गाठ बांधली आहे! Read More »

भविष्यातील भारत ‘भगव्या राष्ट्रवादा’वर आधारित असेल की, ‘सर्वसमावेशक राज्यघटना आधारित राष्ट्रवादा’वर उभारलेला असेल, याची लढाई २०२० मध्ये लढली जाणार आहे!

सरलेल्या वर्षात, म्हणजे २०१९ मध्ये, राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. एक वर्षापूर्वी ज्या प्रकारची परिस्थिती देशात होती, जवळपास तशीच परिस्थिती २०२०मध्ये प्रवेश करताना आहे. फरक एवढाच आहे की, यंदा लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या नाहीत. २०१९च्या एप्रिल-मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीने देश उजव्या विचारसरणीच्या दिशेने ठामपणे झुकला असल्याच्या वस्तुस्थितीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र, उजव्या बहुसंख्याकवादी …

भविष्यातील भारत ‘भगव्या राष्ट्रवादा’वर आधारित असेल की, ‘सर्वसमावेशक राज्यघटना आधारित राष्ट्रवादा’वर उभारलेला असेल, याची लढाई २०२० मध्ये लढली जाणार आहे! Read More »

असे कसे नेहरु? जसे-तसे मोदी!

नरेंद्र मोदी यांचे चीन धोरण पूर्णपणे भारताच्या अंगलट आले आहे. पंडीत नेहरूंना आलेल्या अनुभवानंतर प्रत्येकच भारतीय पंतप्रधानांनी फुंकर मारत ताक प्यायले आहे. याला अपवाद ठरले मोदी! परिणामी आज भारतापुढे दोन नवी मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. एप्रिल २०२० पासून भारत व चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वाढत असलेल्या तणावाचे रुपांतर १५-१६ जुन रोजी प्रत्यक्ष संघर्षात …

असे कसे नेहरु? जसे-तसे मोदी! Read More »

केंद्र सरकारने आणलेला ‘नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा २०१९’ हा नकारात्मक, कुपमंडूक आणि मुस्लीम-द्वेषाचा प्रत्यय देणारा का ठरतो?

‘नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा २०१९’ ची कोणत्याही परिस्थितीत अंमलबजावणी करण्यासंबंधीची वक्तव्ये केंद्रीय गृहमंत्री, अमित शहा आणि सत्तेतील इतर अनेक नेत्यांद्वारे देण्यात येत आहेत. दुसरीकडे, काही राज्यांनी या कायद्याला लागू न करण्याची भूमिका घेत राज्य विधानसभेत या संबंधी ठराव पारीत केले आहेत. नागरिकत्व हा पूर्णपणे केंद्र सरकारच्या अख्यत्यारीतील विषय असल्याने या संदर्भात राज्यांची स्वायत्तता कितपत आहे, हे …

केंद्र सरकारने आणलेला ‘नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा २०१९’ हा नकारात्मक, कुपमंडूक आणि मुस्लीम-द्वेषाचा प्रत्यय देणारा का ठरतो? Read More »

जेएनयुवरील हल्ल्याआधीची आणि नंतरची क्रोनोलॉजी

उणे-पुरे १० हजारापेक्षा कमी विद्यार्थी आणि त्याहून कितीतरी कमी शिक्षक असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठावर अखेर मोदी सरकारचा व सदा-सर्वदा या सरकारच्या सेवेत तत्पर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एवढा राग तरी का आहे? भारताच्या पहिल्या पंतप्रधानांच्या नावाने हे विद्यापीठ उभे आहे, असले पोरकट कारण यामागे निश्चितच नाही. मात्र नेहरूंना अपेक्षित असलेला सर्वसमावेशक भारत या विद्यापीठात नांदतो, …

जेएनयुवरील हल्ल्याआधीची आणि नंतरची क्रोनोलॉजी Read More »

भविष्यातील भारत ‘भगव्या राष्ट्रवादा’वर आधारित असेल की, ‘सर्वसमावेशक राज्यघटना आधारित राष्ट्रवादा’वर उभारलेला असेल, याची लढाई २०२० मध्ये लढली जाणार आहे!

सरलेल्या वर्षात, म्हणजे २०१९ मध्ये, राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. एक वर्षापूर्वी ज्या प्रकारची परिस्थिती देशात होती, जवळपास तशीच परिस्थिती २०२०मध्ये प्रवेश करताना आहे. फरक एवढाच आहे की, यंदा लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या नाहीत. २०१९च्या एप्रिल-मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीने देश उजव्या विचारसरणीच्या दिशेने ठामपणे झुकला असल्याच्या वस्तुस्थितीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र, उजव्या बहुसंख्याकवादी …

भविष्यातील भारत ‘भगव्या राष्ट्रवादा’वर आधारित असेल की, ‘सर्वसमावेशक राज्यघटना आधारित राष्ट्रवादा’वर उभारलेला असेल, याची लढाई २०२० मध्ये लढली जाणार आहे! Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger