भाष्य : चीनची ‘रेषा’ वर्चस्वाची
भारताच्या सीमेवरील चीनच्या कारवाया ‘कोविड-१९’च्या उद्रेकानंतरच्या त्याच्या व्यापक जागतिक व्यवहाराशी सुसंगत असल्या, तरी ‘कोविड’ नसता तरीही चीनने बहुधा ही खेळी खेळलीच असती. ‘कोविड’मुळे आपल्या सामर्थ्यात फरक पडलेला नाही, असा संदेश चीनला यातून शेजारी देशांना द्यायचा आहे. भारत आणि चीन दरम्यान लडाख क्षेत्रात निर्माण झालेला तणाव गंभीर स्वरूपाचा आहे. दोन्ही देशांदरम्यान संयुक्त सचिव, राजदूत आणि कोअर …