भाष्य : हाँगकाँगवासीयांपुढे चीनची कसोटी
प्रस्तावित हस्तांतर कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू असलेल्या हाँगकाँगमध्ये जिल्हा समिती प्रशासनाच्या निवडणुकीला आंदोलक विरुद्ध प्रशासन यांच्यावरील सार्वमताचे स्वरूप आले होते. या निवडणुकीतील यशामुळे आंदोलकांना बळ मिळाल्याने चीनसमोर गंभीर पेचप्रसंग उभा आहे. हाँगकाँगमधील चीनविरोधी निदर्शक व चीनमधील कम्युनिस्ट सरकार यांच्यातील संघर्ष निर्णायक टप्प्यावर आला आहे. हाँगकाँगच्या जिल्हा समिती प्रशासनाच्या निवडणुकीत आंदोलक युवकांचा पाठिंबा असलेले उमेदवार मोठ्या …