International politics

म्यानमारशी सहकार्याची चीनची खेळी

  चीनच्या अध्यक्षांच्या म्यानमार भेटीत झालेले करार आर्थिक महामार्गाशी संबंधित असले, तरी भारताच्या दृष्टीने या आव्हानात्मक बाबी आहेत. विशेषत: भारताच्या ‘लूक ईस्ट’ ते ‘ॲक्‍ट ईस्ट’ आणि ‘नेबरहूड फर्स्ट’ या महत्त्वाकांक्षी परराष्ट्र धोरणांचे फलित काय आहे, याचा लेखाजोखा मांडणे गरजेचे आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दोन दिवसांच्या म्यानमार भेटीमुळे आग्नेय आशियातील आंतरराष्ट्रीय राजकारणात नवी गतिशीलता …

म्यानमारशी सहकार्याची चीनची खेळी Read More »

‘बीआरआय’चे बूमरॅंग?

  चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’वर केंद्रित झाली असून, त्या देशाने अनेक देशांत भरीव गुंतवणूक केली आहे. परंतु चीन व संबंधित देशांसाठी यात मोठी जोखीमही आहे. ची नने महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ या महाप्रकल्पाची घोषणा करण्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत आहेत. चीनने या महाप्रकल्पाचे नामांतर ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) …

‘बीआरआय’चे बूमरॅंग? Read More »

चिनी समाजवाद नव्या वळणावर

  चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली समाजवादी विकास आणि संस्कृती यांच्या मिलाफातून राष्ट्रीय अस्मितेचे नवसर्जन करण्याचा मानस पक्षाच्या काँग्रेसमध्ये व्यक्त झाला आहे. चीनच्या राजकीय पटलावर दर पाच वर्षांनी भरणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय काँग्रेसची आज सांगता होत आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या देशभरातील विविध क्षेत्रांतील पक्षशाखांमधून काळजीपूर्वक निवडण्यात आलेले २३०० प्रतिनिधी या आठवडाभराच्या काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. ही पंचवार्षिक …

चिनी समाजवाद नव्या वळणावर Read More »

डोकलाम-पल्याड जायलाच हवे!

  भारत आणि चीनदरम्यान भूतानच्या प्रभुत्वाखालील डोकलाम क्षेत्रात लष्करी तणाव उत्पन्न झाल्याच्या पाश्र्वभूमीवर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेले भाषण महत्त्वपूर्ण आहे. भारत-चीन संबंधांवर भाष्य करताना ‘युद्ध हा कोणत्याही समस्येवरील उपाय होऊ शकत नाही’ आणि ‘चच्रेतून प्रश्न सोडवण्यात राष्ट्रहित’ असल्याचा  त्यांचा सूर होता. दीड महिन्यांहून अधिक काळापासून डोकलाम भागात भारत व चीनचे सन्य एकमेकांसमोर …

डोकलाम-पल्याड जायलाच हवे! Read More »

एकविसावे शतक कुणाचे?

  ज्याप्रमाणे १९वे शतक हे युरोपच्या आणि २०वे शतक हे सोव्हिएत संघ व अमेरिकेच्या वर्चस्वाचे होते, तसे २१वे शतक चीनच्या वर्चस्वाचे असेल असे एक गृहीतक आहे. मात्र यासाठी चीनला विज्ञान व तंत्रज्ञान, उद्योग, लष्करी सुसज्जता यांच्याकडे लक्ष देतानाच विकासाचे नवे मॉडेल उभे करावे लागेल.. या  वर्षभरात ‘चीन-चिंतन’ या सदरात आपण चीनच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेण्याचा …

एकविसावे शतक कुणाचे? Read More »

चिनी समाज व साम्यवादी पक्ष

  चीनच्या संदर्भातील खरा प्रश्न आहे की समाजातील ज्या गटांची भरभराट झाली आहे ते साम्यवादी पक्षाचे नेतृत्व आणि कार्यप्रणाली कधीपर्यंत मान्य करणार? चीनने आíथक विकासातील तो टप्पा आता गाठला आहे जिथे समाजातील सर्वाधिक संपन्न गटांना आपले स्थान टिकवण्यासाठी साम्यवादी पक्षाची गरज उरलेली नाही. मात्र साम्यवादी पक्षाच्या म्हणण्यानुसार चिनी समाजात पक्षाचे स्थान अमर्त्य आहे.  चीनमध्ये आर्थिक सुधारणांची …

चिनी समाज व साम्यवादी पक्ष Read More »

पाण्याचे राजकारण धुमसते आहे!

  चीनच्या ब्रह्मपुत्रेवरील धरणांमुळे समस्या उभी राहण्याची शक्यता असली, तरी तूर्तास यावरून युद्ध करण्याची चीनची तयारी नाही आणि भारताला परवडणारे नाही. तिसरे महायुद्ध, जर झालेच तर, पाण्याच्या प्रश्नावरून लढले जाणार असे भाकीत अनेक सामरिक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. महासागरांवरील अधिकारांसह नदीच्या पाण्यावरील अधिकाराच्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या देशांमध्ये उत्पन्न होणाऱ्या तंट्याचे रूपांतर महायुद्धात होईल असे ब्रह्मा चेलानीसारख्या …

पाण्याचे राजकारण धुमसते आहे! Read More »

१९६२ चे युद्धबंदी

  अमेरिका पूर्वी पाकिस्तानच्या पाठीशी उभा होता आणि त्याआधारे पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवायांना बळ मिळत असे. अमेरिकेची जागा आता चीनने घेऊ नये यासाठी भारताला विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सर्वात आधी सन १९६२ च्या युद्धबंदीच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल.. भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाचे युद्धात रूपांतर होते की काय अशी स्थिती उत्पन्न झाली असताना, या महिन्यात भारत-चीन युद्धाला …

१९६२ चे युद्धबंदी Read More »

भ्रष्टाचारमुक्तीची जिनपिंग धडपड

  चीनच्या साम्यवादी पक्षाविरुद्ध जनतेतील वाढत्या नाराजीची दखल घेत अध्यक्ष क्षी जिनिपग यांनी भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला प्राधान्य दिले. मात्र त्यांच्या मोहिमेने जनतेत धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. याला कारणीभूत आहे चीनच्या साम्यवादी पक्षाचा सत्तेत आल्यानंतरचा इतिहास.. २५ जुलै २०१६ रोजी चीनमधील लष्करी न्यायालयाने जनरल कुआ पोशिओंक या निवृत्त उच्च-तारांकित सन्य अधिकाऱ्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. जनरल …

भ्रष्टाचारमुक्तीची जिनपिंग धडपड Read More »

चीनला हवे तरी काय?

  चीनने भारताच्या एनएसजी प्रवेशाला तूर्तास तरी मान्यता दिलेली नाही. या खेळीतून चीनने भारताला पाकिस्तानच्या स्तराला नेऊन ठेवले आहे. भविष्यात भारतापुढे केवळ एनएसजी प्रवेशाचे आव्हान नसून त्याबरोबर पाकिस्तानशी होत असलेल्या तुलनेतून सुटका करून घेण्याचे प्रयत्नसुद्धा करायचे आहेत. अणू पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व भारताला मिळवण्याचा मुद्दा नरेंद्र मोदी सरकारने जेवढा प्रतिष्ठेचा केला होता त्याच प्रमाणात चीनने …

चीनला हवे तरी काय? Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger