अपयशालाच ‘अभूतपूर्व यश’ म्हणून कुरवाळत बसले की, वारंवार पठाणकोट, उरी व पुलवामासारख्या घटना घडतात!
भारतासह संपूर्ण जगात Valentine’s Day च्या रूपात प्रेमाचा उत्सव साजरा होत असताना पाकिस्तानातून कार्यरत असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांच्या वाहनावर क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात शहीद झालेले ४२ सैनिक सदैव भारताला व जगाला दहशतवादी क्रूरतेची आठवण करत राहतील. प्रेम, जिव्हाळा व एकोप्याशी कायमचे शत्रुत्व असलेल्या दहशतवादी संघटनेने मुद्दामच १४ फेब्रुवारी या दिवसाची …