केंद्र सरकारने आणलेला ‘नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा २०१९’ हा नकारात्मक, कुपमंडूक आणि मुस्लीम-द्वेषाचा प्रत्यय देणारा का ठरतो?
‘नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा २०१९’ ची कोणत्याही परिस्थितीत अंमलबजावणी करण्यासंबंधीची वक्तव्ये केंद्रीय गृहमंत्री, अमित शहा आणि सत्तेतील इतर अनेक नेत्यांद्वारे देण्यात येत आहेत. दुसरीकडे, काही राज्यांनी या कायद्याला लागू न करण्याची भूमिका घेत राज्य विधानसभेत या संबंधी ठराव पारीत केले आहेत. नागरिकत्व हा पूर्णपणे केंद्र सरकारच्या अख्यत्यारीतील विषय असल्याने या संदर्भात राज्यांची स्वायत्तता कितपत आहे, हे …