भोपाळप्रमाणे देशाच्या जवळपास सर्वच शहरी भागांमध्ये काँग्रेस अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडते आहे!
मध्य प्रदेशात २८ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भोपाळ शहरात भाजपचे पारडे निर्विवादपणे जड आहे. मागील १५ वर्षे सत्तेत असूनसुद्धा सरकार विरुद्ध, विशेषत: मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या विरुद्ध, शहरात नाराजीचा सूर आढळत नाही. ग्रामीण भागातील वास्तव कदाचित वेगळे असेल. मात्र मध्य प्रदेशच्या राजधानीत सर्व वयोगटांतील, तसेच सर्व स्तरांतील स्त्री-पुरुष पुन्हा एकदा भारतीय …