नरेंद्र मोदी

१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे?

  २०१६ मधील ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पाकिस्तानवर काहीच परिणाम झाला नाही आणि नोटबंदीने प्रचंड फायदा होण्याऐवजी तोटाच मोठा झाला, या दोन वास्तवाची कबुली खुद्द सरकारनेच वेगवेगळ्या माध्यमांतून देऊ केली आहे. जे दोन मुद्दे मोदींनी आपल्या सरकारची सर्वोत्तम कामगिरी म्हणून मिरवले, त्याच आघाडीवर त्यांचे सरकार सपेशल अपयशी ठरल्याचे सर्वसामान्य जनतेला ज्ञात झाल्यावर आता आर्थिक ‘निकषावर’ १० टक्के …

१० टक्के आर्थिक आरक्षण : तुज ‘निवडणूकपूर्व बक्षिसी’ म्हणू की ‘गुळगुळीत गाजर’ रे? Read More »

रात्र अजून वैऱ्याचीच आहे…

  २०१८ च्या अखेरीस आलेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ‘जान’ आणली आहे. या निवडणूक निकालांनंतर, ‘मोदींना पर्याय कोण?’ हा प्रश्न विचारणारे आता नितीन गडकरींमध्ये ‘विकासपुरुष’ शोधू लागले आहेत. तीन राज्यांतील निवडणूक निकालांच्या आदल्या दिवसापर्यंत हे राजकीय पंडित मोदींनंतर, म्हणजे २०२४ मध्ये, योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान होणार, असे छातीठोकपणे सांगत होते. …

रात्र अजून वैऱ्याचीच आहे… Read More »

११ डिसेंबरला मध्य प्रदेशात भाजपला पुन्हा सत्ता मिळाली तर त्याचा कुठेही जल्लोष नसेल!

मध्य प्रदेश विधानसभेसाठी २८ नोव्हेंबरला मतदान आटोपल्यानंतर राज्यात भयाण राजकीय शांतता पसरली आहे. मतमोजणीला अवकाश असल्याने सत्ताधारी पक्षाद्वारे मतदान यंत्रांमध्ये छेडछाड होत असल्याच्या थोड्या बातम्या व काही अफवा वगळता राज्यात निवडणूक निकालांच्या राजकीय परिणामांची चर्चा करण्यात फारसे कुणाला स्वारस्य दिसत नाही. भारतीय जनता पक्ष विजयी झाल्यास शिवराजसिंह चौहान यांना लोकसभा निवडणुकीपर्यंतच मुख्यमंत्रीपद मिळणार आणि नरेंद्र …

११ डिसेंबरला मध्य प्रदेशात भाजपला पुन्हा सत्ता मिळाली तर त्याचा कुठेही जल्लोष नसेल! Read More »

सातत्याने वृद्धिंगत होत गेलेल्या व्यापारी-भाजप संबंधांमध्ये प्रथमच कटुता निर्माण झाली आहे!

  छोटी शहरे व मोठी गावे ही ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीची केंद्रे! आजूबाजूच्या पाच-पंचवीस-पन्नास छोट्या गावांना, तांड्यांना, वस्त्यांना आर्थिक चक्रात गुंफत स्वत:चे हित साधणारी ही छोटी शहरे व मोठी गावे तशी सामाजिक चर्चाविश्वात थोडी दुर्लक्षलेलीच आहेत. महात्मा गांधींच्या काळात जर भारत खेड्यांमध्ये वसलेला होता, तर आजच्या काळात तो खेड्यांएवढाच महानगरांमध्ये आणि स्वत:ला शहर म्हणण्यात धन्यता …

सातत्याने वृद्धिंगत होत गेलेल्या व्यापारी-भाजप संबंधांमध्ये प्रथमच कटुता निर्माण झाली आहे! Read More »

सातत्याने वृद्धिंगत होत गेलेल्या व्यापारी-भाजप संबंधांमध्ये प्रथमच कटुता निर्माण झाली आहे!

  छोटी शहरे व मोठी गावे ही ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीची केंद्रे! आजूबाजूच्या पाच-पंचवीस-पन्नास छोट्या गावांना, तांड्यांना, वस्त्यांना आर्थिक चक्रात गुंफत स्वत:चे हित साधणारी ही छोटी शहरे व मोठी गावे तशी सामाजिक चर्चाविश्वात थोडी दुर्लक्षलेलीच आहेत. महात्मा गांधींच्या काळात जर भारत खेड्यांमध्ये वसलेला होता, तर आजच्या काळात तो खेड्यांएवढाच महानगरांमध्ये आणि स्वत:ला शहर म्हणण्यात धन्यता …

सातत्याने वृद्धिंगत होत गेलेल्या व्यापारी-भाजप संबंधांमध्ये प्रथमच कटुता निर्माण झाली आहे! Read More »

शेतमजूर व शेतकऱ्यांमधील असंतोषाचा सामना करत भाजपचा विजयरथ भोपाळला पोहोचणार?

  मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून जस-जसे दूरदूर जावे, तस-तसे देशाच्या ‘इंडिया’ व ‘भारत’ फाळणीचा प्रत्यय येत जातो. राज्याच्या ‘इंडिया’ भागात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जेवढा जबरदस्त पाठिंबा मिळतो आहे, तेवढाच विरोध राज्याच्या ‘भारत’ भागात सहन करावा लागतोय. मध्य प्रदेशातील ग्रामीण भागात गावेच्या गावे अशी आहेत, ज्यांनी २०१३ च्या विधानसभेत आणि २०१४ च्या लोकसभेत भाजपला शत-प्रतिशत …

शेतमजूर व शेतकऱ्यांमधील असंतोषाचा सामना करत भाजपचा विजयरथ भोपाळला पोहोचणार? Read More »

डॉ. हमीद अन्सारी : मोदी, मोदीभक्त आणि भाजपला न आवडलेले उप-राष्ट्रपती!

  २०१५ चा भारतीय प्रजासत्ताक दिन! वर्षानुवर्षे दूरचित्रवाणीवरून होणाऱ्या थेट प्रसारणाने देशभरातील नागरिकांच्या कौतुहूलयुक्त उत्सुकतेचा प्रजासत्ताक दिन सोहळा २०१५ मध्ये दोन कारणांनी अधिकच आकर्षक झाला होता. एकतर, भव्यदिव्य कार्यक्रम आयोजनात ज्यांचा हातखंडा अख्ख्या जगाने मान्य केला आहे, अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिलाच प्रजासत्ताक दिन होता. साहजिकच जादूगराच्या टोपीतून कोणकोणती कबुतरे निघतील याच्या कल्पनेनेच त्यांचे …

डॉ. हमीद अन्सारी : मोदी, मोदीभक्त आणि भाजपला न आवडलेले उप-राष्ट्रपती! Read More »

साबरीमाला : मोदी ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ घोषणेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत!

  साबरीमाला प्रकरणी स्मृती इराणी बोलल्या ते बरे झाले! या निमित्ताने भाजपमधील त्यांच्यासारख्या महिला नेतृत्वाने चढवलेला आधुनिकतेचा मुखवटा गळून पडला! तसा तो भाजपच्या महिला नेतृत्वावर कधीच चपखल बसला नव्हता. मात्र मध्यमवर्गीय महिला आणि महाविद्यालयीन युवक-युवतींना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी नरेद्र मोदींच्या प्रचारचमुने जाणीवपूर्वक उमा भारतीसारख्या भगव्या वस्त्रातील नेतृत्वावरून प्रकाशझोत स्मृती इराणी आणि मीनाक्षी लेखींसारख्या महिला नेतृत्वाकडे …

साबरीमाला : मोदी ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ घोषणेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत! Read More »

‘सर्जिकल स्ट्राईक’ची चालीसा

  येत्या २९ सप्टेंबर रोजी सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी ‘सर्जिकल स्ट्राईक दिन’ साजरा करावा असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिले आहेत. दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्याने नियंत्रण रेषा ओलांडत पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवाद्यांच्या एका टोळीला यमसदनी पाठवले होते. तेव्हापासून ही घटना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची फार मोठी उपलब्धी असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’ दिनाच्या निमित्त्याने ही …

‘सर्जिकल स्ट्राईक’ची चालीसा Read More »

राहुल गांधींच्या ‘मिठी’पेक्षा त्यांचं भाषण अधिक महत्त्वाचं आहे!

  तेलुगु देसम पक्षाच्या अट्टाहासाने आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाचा सर्वाधिक फायदा राहुल गांधींनी उचलला. एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ना त्या माध्यमातून दररोज लोकांसमोर आपले म्हणणे मांडत असतात. मात्र पहिल्यांदाच देशाने एवढ्या उत्सुकतेने राहुल गांधींचे संपूर्ण भाषण ऐकले आणि टीव्ही वाहिन्या व सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या बाबतीत राहुलने मोदींवर मात केली. थकलेले मोदी, उत्साही राहुल आणि …

राहुल गांधींच्या ‘मिठी’पेक्षा त्यांचं भाषण अधिक महत्त्वाचं आहे! Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger