पाकिस्तान

मागील पाच वर्षांत मोदी सरकारची कामगिरी घोर निराशाजनक ठरली आहे, कलम ३७० रद्द केल्याने त्यात फरक पडण्याची सुतमात्र शक्यता नाही!

२०१६मध्ये पाकिस्तानधार्जिण्या अतिरेक्यांनी आधी पठाणकोट व नंतर उरी इथे लष्करी छावण्यांवर हल्ले करत भारतीय जवानांच्या हत्या केल्या. त्यानंतर मोदी सरकारने ‘सर्जिकल स्ट्राइक’चा पट मांडला. त्यापूर्वी या प्रकारच्या कारवायांना ‘क्रॉस-बॉर्डर रेड’ म्हणण्यात येत असे. मात्र मोदी सरकारने ‘क्रॉस-बॉर्डर रेड’ला ‘सर्जिकल स्ट्राइक’ या नावाने जल्लोषात साजरे केले. हा जल्लोष एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की, आता काश्मीरमधील दहशतवाद्यांचा …

मागील पाच वर्षांत मोदी सरकारची कामगिरी घोर निराशाजनक ठरली आहे, कलम ३७० रद्द केल्याने त्यात फरक पडण्याची सुतमात्र शक्यता नाही! Read More »

नियंत्रण रेषेच्या अल्याड-पल्याड

भारत-पाकिस्तानदरम्यानची नियंत्रण रेषा ही जगातील सर्वात स्फोटक भूप्रदेशांपैकी एक आहे. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या नियंत्रण रेषेवरील चकमकींचा आणि एरवी हा भाग कसा असतो, याचाही धांडोळा घेणाऱ्या पुस्तकाबद्दल. भारत आणि पाकिस्तान संबंध व संघर्षांवर वारेमाप साहित्य उपलब्ध आहे. मात्र, फार कमी साहित्यातून द्विपक्षीय संबंधांची अथवा या संबंधांतील काही पलूंची अभ्यासपूर्ण व संतुलित मांडणी केलेली असते. त्याहूनही कमी लेखन हे प्रत्यक्ष …

नियंत्रण रेषेच्या अल्याड-पल्याड Read More »

‘सर्जिकल स्ट्राईक’ची चालीसा

  येत्या २९ सप्टेंबर रोजी सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी ‘सर्जिकल स्ट्राईक दिन’ साजरा करावा असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिले आहेत. दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्याने नियंत्रण रेषा ओलांडत पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवाद्यांच्या एका टोळीला यमसदनी पाठवले होते. तेव्हापासून ही घटना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची फार मोठी उपलब्धी असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’ दिनाच्या निमित्त्याने ही …

‘सर्जिकल स्ट्राईक’ची चालीसा Read More »

वाजपेयी ‘जिवंत’ राहतीलच, त्यांचा वारसा मात्र ‘मरण’ पावलाय!

  अटल बिहारी वाजपेयी अस्सल राजकारणी होते. ते राजकारणात नसते तर भारताच्या परराष्ट्र सचिव पदावरून निवृत्त होत कदाचित संयुक्त राष्ट्राचे महासचिव झाले असते. कविता करणे हा त्यांचा छंद होता आणि काश्मीर त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. राजकारणातील बहुतांश काळ त्यांनी विरोधी बाकांवर काढला होता. विरोधी पक्षात असतानासुद्धा ते काश्मीर प्रश्नावर अधिकारवाणीने बोलत. काश्मीरबाबतीत सुरुवातीच्या काळात त्यांचा …

वाजपेयी ‘जिवंत’ राहतीलच, त्यांचा वारसा मात्र ‘मरण’ पावलाय! Read More »

इम्रान खानला ज्या खेळाच्या बळावर एवढे मोठे यश मिळाले, निदान त्याच्याशी इमान राखावे!

  सन १९८७ मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा क्रिकेट चमू भारतात आला होता. दोन्ही देशांदरम्यान नियमितरीत्या क्रिकेट मालिका खेळल्या जाण्याचा तो काळ होता. त्याच्या एक वर्ष आधी, म्हणजे १९८६ मध्ये, भारताने ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ या नावाने राजस्थानच्या वाळवंटात प्रचंड मोठ्या लष्करी कवायती केल्या होत्या. या कवायती म्हणजे पाकिस्तान विरुद्ध युद्धाची तयारी असल्याची भीती पाकिस्तानच्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी …

इम्रान खानला ज्या खेळाच्या बळावर एवढे मोठे यश मिळाले, निदान त्याच्याशी इमान राखावे! Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger