गांधी हयात असेपर्यंत इतर सर्व त्यांच्यापुढे खुजे ठरले आणि नंतरही त्यांची उंची कुणाला गाठता आली नाही!
आजपासून (२ ऑक्टोबर २०१८) महात्मा गांधींचे १५० व्या जयंतीचे वर्ष सुरू होत आहे. सरकारी आणि गैर-सरकारी स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने हे वर्ष धुमधडाक्यात साजरे होणार यात शंका नाही. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या केंद्रस्थानी राहण्याचा मान केवळ गांधींनाच मिळाल्याने, किंवा तो टिकवून ठेवणे फक्त त्यांनाच जमल्याने, स्वातंत्र्यानंतरदेखील त्यांची मूल्ये, पद्धती आणि कृती सातत्याने चर्चेत राहिली आहे. यातून …