सत्याची मोडतोड हेच ज्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य आहे, त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवावी?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवडणूक अर्ज भरण्याच्या तारखेत बदल करत मुंबईला प्रचार सभा घेतली. त्यांच्या मुंबईच्या भाषणात तीन बाबी ठळकपणे जाणवल्यात. एक, मध्यमवर्गाची वारेमाप स्तुती; दोन, पोलीस कर्मचाऱ्यांवर स्तुतिसुमने; आणि तीन, पुलवामा-बालाकोट या शब्दांचा अनुल्लेख! मुंबईच्या सभेत मोदींनी ना गरीब मतदारांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मते मागितली, ना आपण स्वत: कशी गरिबी अनुभवली आहे यावर ते बोलले. …